विशाखासमीर मशानकर

विशाखासमीर मशानकर
"विश्वत" माझे पहिले पुस्तक

दीर्घकथा - घुसमटलेले वादळ !!



विशाखा, मी वेगळी होतेय " अजूनही आठवतो दिवस !! पायाखालची जमीन सरकवणारा !! एखाद्या भयानक स्वप्नासारखे ते क्षण !!

का बोलली असेल ती अस? पेक्षा ती अस बोलूच कस शकते? जिची सकाळ प्रिया व मनूच्या  नावाने सुरु होते आणि दिवस रात्री ११ - १२ वाजता नवऱ्याला   गरम गरम पोळ्या खावू घालून संपतो अशी माया!!

आमच्याकडे आल्यावर सतत धांगडधिन्गा घालणारी माझी मुल आणि त्यांच्यासोबत TV कॉम्पुटरवर यथेच्च मौज करणाऱ्या आमच्या कुटुंबाला "Study and courier first " अस म्हणणारी , मी तुझ्या मुलांना कधीच अभ्यास करताना पाहत नाही अस म्हणणारी, माझ्या social work आणि clubingsla नेहमी नाक मुरडणारी, तासंतास workout करून सासूला देवळात घेवून जाणारी - एक कर्तव्यदक्ष आई, बायको, सून !! मग एकाएकी अस काय झाल असेल?

वाईट मनु  आणि प्रीयाबद्दल वाटत होत . त्यांचे केविलवाणे चेहरे डोळ्यासमोर नाचत होते. निदान त्यांच्याकरता तरी...............

"त्यांना कळेल मोठ झाल्यावर कि आपल्या आईची काहीच चूक नव्हती" तीच उत्तर.

Hmmmmmm  .... मोठी झाल्यावर तर सगळीच शहाणी होतात निदान शहाणपणाचा आव तरी आणतात पण हिची हि छोटुली दोन पाखर लहानपणीच मोठी होणार आई असून आईविना !!नुसत्या  विचारांनी डोक बधीर झाल.

मुलांनी दार उघडल्यावर लक्षात आल कि आपण घरी आलोय.  मुलांना घट्ट मिठी मारली ....डोळयातून केव्हा पाणी सुरु झाल कळल देखील नाही. रविवार असल्यान समीरच खोलीत वाचन सुरु होत "माया वेगळी होतेय " जणू काही माझच घर माझ्यापासून दुरावतय अस वाटायला लागल्याने ओक्साबोक्शी रडली. रविवार असून घरातील वातावरण क्षणात सुतकी !!

"आई पागल झाली का ग माया aunty ? आपल्या बाळांना सोडून जातात का कुणी कधी?" प्रतीशचा प्रांजळ प्रश्न.

"विशाखा तुझ्याकडे असल्या कितीतरी cases येतात" सासुबाईंचा समजावणीचा सूर ...........

"पण हि case नाही आई, तुम्हाला कस सांगू? तीने  "वेगळी होते" म्हटल्यावर तिच्या भावान अक्षरशः मारलं तिला.... तिच्या चीमुर्ड्यांसमोर!! राग प्रत्येकालाच येतो पण त्याच हे असल प्रकटीकरण? सुशिक्षित उच्चभ्रू  घरात हा असला अमानुष प्रकार?? पार पार हादरलेय मी आज !! आणि येव्हढ सगळ मला कळूनही थरथरत्या हातानी तिचा हात हातात घेवून मी तिला म्हटले ,"माया निदान प्रिया - मनु करतातरी.... "

ती मात्र पक्की ,"विशाखा, No one is there with me. माझा नवरा, माझी आई, माझे वडील, भाऊ, सासू,........ एकटी असूनही मी डगमगली नाही आणि तू माझा आधार आहेस तूच जर रडत बसलीस तर मी कुठे जावू? मला तुझी साथ हवीय या सर्वात !! खंबीरपणे उभ राहायचंय तुला माझ्यासोबत .......

सतत कानावर आदळत होते ते शब्द आणि प्रत्येक शब्दात त्या चिमुकल्यांचे चेहरे !! माझ्या डोळ्यांसमोर माझ्या मैत्रिणीचा संसार मोडतांना दिसतोय आणि मी खंबीर राहायचं? कुठून आणायची शक्ती? कुठून आणायचं बळ ? जिथ डोकच बधीर झाल तिथे कसा होणार विचार?

दोन दिवस नुसता विचार करून हिम्मत बांधली आणि फोन हातात घेतला...

" माया आहे?"

  "नाही ती ऑफिसला गेलीय, तिच्या cellvar contact kar " नेहमीच्याच नम्र स्वरात कुमार - मायाचा - नवरा !!

"पण मला तुमच्याशीच बोलायचं," त्याला सरळ विचारल " काय झाल? मला जरा सविस्तर सांगशील?"

मग त्याच पुराण सुरु झाल...............मी किती छान, माझी काहीच चुकी नाही, तासभर स्वतःच कौतुक !!

" तीन flat बुक केलाय शिफ्ट होते म्हणतेय दोन दिवसात , तुझ्याशी काही बोलली ती?" मी मुद्द्यावर आणत म्हटल.

" आमच्यातील संवाद कधीच संपलाय विशाखा. आम्ही एकमेकांना mail करतो किवा SMS "

"भांडण किवा काही वाद?"

"तो प्रश्नच नाही, तुला तर माहितीच आहे कि ती बोलत असतांना कोणी बोललेले तिला चालत नाही. तरीही मी तिला तिच्या डोळ्यासमोर नकोय. She hates me like anything.मी diamond necklace दिला तिच्या वाढदिवसाला ........ तीन तो box उघडूनदेखील  बघितला नाही. तिच्याकरता nano बुक  केलीय !! और क्या करेगा कोई????"

"विशाखा, आपण family counceller कडे जायचं? मी गेलो होतो पण ते दोघानाही या म्हणतात. मी दिसलो कि तिची तळपायाची आग मस्तकात जाते..... कस जाणार दोघ? मी वाटल तर बाहेरगावची नौकरी पाहीन पण ती तुझ्या जवळची आहे म्हणून सांगतो तिला थांबव for my two little angels. please help me. "

12 -13 वर्ष एकत्र संसार केल्यावर अस काय झाल असेल? पुन्हा विचारांचं थैमान!!

 " विशाखा तुला एक सांगू का? त्या मद्रास्यानी (कुमार) काहीतरी जोरदार लफड केल असणार " आमच्या नवरोजिच  प्रामाणिक मत !!

हे  सार  वर्षभरापासून सुरु होत आणि मला का नसेल सांगितलं याबद्दल मायाने काही ? राहून राहून वाईट वाटत होत अगदी शुल्लक शुल्लक गोष्टींकरता फोन करणारी माया , हे प्रकरण इतक समोर गेल तरी का नसेल सांगितलं मला?  Diamond Set बद्दल कुमारने जे काही सांगितलं ते धादांत खोट होत !! कारण त्याच्या Promotion  च्या पार्टीत तिने तो सेट घातला होता !! मग खर कोण ? चांगुलपणाचा मुखवटा घातलेला कुमार कि तोडफोड बोलून निर्णयाला पोहोचलेली माया? कुमार म्हणतोय कि त्याच्याच शिफारशीने  तिला नौकरी मिळाली , पण नौकरी मिळाल्यावर ती financially Independent होवून घर सोडणार हे माहित असतांना त्याने तिला का नौकरी मिळवून दिली?

वादळ विचारांचे नुसते वादळ !!

"Vishakha can I talk to you now if you don't mind?" सकाळी साधारण १० वाजता कुमारचा फोन !!

"Yes please"

" तिने तुला काय कारण सांगितलं वेगळ व्हायचं? तू तीला कारण विचारलच  असशील ना? माझ किवा माझ्या आईच काही चुकल का? आम्ही दोघाही तयार आहोत माफी मागायला पण तीन एकदा तरी आमच्याशी बोलाव अगदी यंत्रयावत वागतेय ती !! घरात मुलांना शाळेचाच tiffin लावलाय ते शाळेत गेले कि लगेच हि Gym आणि तेथूनच ofiicela निघून जाते. गेल्या १३ वर्षांपासून घरावर तिचंच साम्राज्य आहे. स्वयंपाकघरातील कितीतरी गोष्टी आईला माहित देखील नाहीत. तरीही आईची काहीही तक्रार नाही फक्त मायाने घर सोडून जावू नये. मला कारण सांगतेस का?"

माझ डोक अजूनही जडच !! काय कप्पाळ कारण सांगणार याला? जी कारण मला तिने सांगितलेली आहेत ती जरा तरी valid आहेत का? तरीही तो इतकी गळ घालतोय म्हणून सांगून टाकल........ "तुम्ही तिला फिरायला घेवून जात नाही, shopping लाही  नाही आणि तिच्याशी गप्पाही मारत नाही"

कित्ती लाजिरवाणी कारण ....... मला वाटल कि या कारणांवर कुमारही हसेल पण .............. त्याच आयुष्यच एक विनोद बनलेलं तो हसेल तरी कसा?

बिच्चारा स्थितप्रज्ञ !!

मी जेव्हा हि कारण नाव बदलवून मैत्रिणींमध्ये सांगितली तेव्हा त्या अक्षरश: गडगडल्या

" Nothing Vishakha its an extra marital affair !!"

Extra marital affair? आणि माया ??? शक्यच नाही तेव्हा तर तिला job पण नव्हता आत्ता आठ दिवसांपूर्वी लागलाय. हे प्रकरण तर १ वर्षापासून  सुरु आहे. ती कुठेही socialising ला  जात नाही फक्त Gym आणि swimming . ज्या काही आम्ही ५-६ तिच्या मैत्रिणी आहोत तेव्हढ्याच आणि आमचे सर्वांचे नवरे intact आहेत.

मग???

कुमारच फोनवर बोलण सुरूच होत " कैसे और कब ले जाता उसको बहार? सकाळी मुल शाळेत गेल्या गेल्या ती gym मध्ये जाते, मी office ला   जाईपर्यन्तही थांबत नाही. संध्याकाळी घरी आल्यावर मुलांचा टेनिस आणि गाण्याचा क्लास!! आणि तिथून आल्यवर मुलांचा अभ्यास. Shopping ला तिच्यासोबत गेलो तर माझी एकही गोष्ट तिला आवडत नाही दुकानदारासामोरही माझा पाणउतारा करायला मागे पुढे पाहत नाही म्हणून तिला म्हटल कि तुझ्याकडे क्रेडीट कार्ड आहे गाडी आहे आणि driver हि ........तर यात माझ काय चुकल?



Hmmm ............. लग्न झाल्यावर १३ वर्षांनी या सर्व गोष्टी? पहिले दोन तीन वर्ष ठीक पण ....................या गोष्टी फक्त मायाच्या  घरातच नाहीत तर घरोघरी दिसतात. स्पर्धेच्या युगात आपण इतक धावत असतो कि आपल्या कर्तव्यांसमोर आपली माणस आपल्यापासून कधी दुरावलीत हे कळतदेखील नाही .  जिथे दोन माणसातला वाद / संवाद संपतो तिथे ते नात तुटत म्हणतात.

पण हे कारण असू शकत का?.............

मग.............. दोन दिवस माझ मायाला ब्रेन्वाशिंग कारण सुरु झाल - तिला प्रत्यक्ष भेटून, फोनवर, SMS जस शक्य होईल तस मी तिला तासभराच्या वर एकट राहू दिल नाही जोपर्यंत तिनी मला कबुल केल नाही कि ती १५ दिवसांनी शिफ्ट होईल म्हणून !!

 "आजच मरण उद्यावर टळल "

मलाही विचार करायला वेळ हवा होता.

अचानक फोन वाजला display नाव वाचून मला आश्चर्यच वाटल.

'स्मिता??' आणि मला फोन?? अगदी प्रत्येक निरोप मायाकडून माझ्याकडे पाठविणारी स्मिता आज मला फोन ??

" Hi dear!! Smita here!!"

"Hi how are you?"

हे हाय हेल्लो झाल्यावर हळू हळू स्मिता राणी मूळ मुद्द्यावर आल्यात " मला आणि मायाच्या आईला तुला भेटायचं आहे. उद्या येवू? "

"आनंदानी!! दुपारी १२ नंतर कारण १२ वाजता समीर office ला जातो आणि ४ च्या आधी कारण ४ वाजता माझी मुल घरी येतात !!"



  मनात पुन्हा प्रश्न - मला हे सर्व माहित झाला हे हिला कोणी सांगितलं? मी जे काही कुमारशी बोलले त्यातील शब्द न शब्द !!

दोघीही दुसऱ्या  दिवशी माझ्या घरी आल्या . नुसते कुमारचे गुण तो कित्ती चांगला आहे ...........१ तास !!

" काकू, एक विचारू? हे सर्व ठीक आहे पण का मारलं अतुलनी(मायाचा भाऊ ) मायाला?असल्या प्रकरणांनी गोष्टी चिघळतात" मी सरळ मुद्द्यावर !!

तिची आई एकदम तडकलीच !! माझ्याकडून या प्रश्नाची अपेक्षाच नव्हती त्यांना. " तुला काय माहिती विशाखा? त्यादिवशी झाले ते? मायाकडे  पूजा होती आम्ही पूजा आटोपून आमच्याघरी येत नाही तेच कुमारचा फोन आला कि हि घर सोडून जातेय आत्ता आवरासावर सुरु झालीय, मग मी आणि अतुल दोघही तसेच वापस गेलो तिला समजावले पण ती ऐकायला तयारच नाही शेवटी अतुलने हात उचलला नाईलाजास्तव !! आई आहे मी तिची !! माझी काय अवस्था झाली असेल तू कर ना विचार? अतुलनी वडिलांचं कर्तव्य पार पाडलं बस !!"

मी स्तब्ध !! आमच्या आई अवाक !!



स्मितानेही मायाच्या आईची री ओढली

" तुला खर काय ते सांगतो आम्ही आता ............... तुला ती कधी हर्बल product बद्दल बोलली?"

"हो तिचे कोणी दोन  मित्र आहेत म्हणाली gym मधले पण तिला नाही त्यात इंटरेस्ट "

"तू पाहिलस कधी त्यांना?"

"नाही"

"त्यातील एक बायकोला घेवून प्रियाच्या वाढदिवसाला आला होता एक लठ्ठ lady मायाच्या आईच्या बाजूला बसली होती "

"Didn't notice "

"तिचा नवरा आणि माया यांनी एकमेकांना 436 SMS केलेत दोन दिवसात !! गायत्रीचा नवरा Airtel मध्ये आहे न त्याच्याकडून माहिती काढली. हिने याच दोन दिवसात ५ लाख रुपये withdraw केलेत. म्हणून अतुलनी आणि कुमारनी तिच्यामागे detective hire केलेत."



माझी आणि आईंची स्तब्धता कायम !! माझा तर डोळ्यांवर आणि कानांवर विश्वासच बसत नव्हता.

"विशाखा, माझ्या मुलीला फसविल्या जातंय. हे काही प्रेम किवा लफड नाही ती कुठेतरी trap झालीय. आमच्याशी ती काही म्हणजे काहीच  बोलत नाही तूच आता आमच्यातील दुवा आहेस"



"काकू मला थोडा वेळ द्याल? आता १५ दिवस तरी ती वेगळी होणार नाही अस मला सांगितल तिने . भरपूर वेळ आहे. आपण वेळ पडल्यास माझ्या काही seniors चाही advice घेवू. पण आपण सर्व एकमेकांच्या संपर्कात आहोत हे मायाला कळता कामा नये. देवावर विश्वास ठेवा सर्व व्यवस्थित होईल "

भरल्या डोळ्यांनी मायाच्या आईने आमचा निरोप घेतला.

"विशाखा, तू या प्रकरणात बिलकुल पडणार नाहीये हे सर्व विचित्र आणि गंभीर  दिसतंय. समीरला जर कळल तर ओरडेल तुझ्यावर !!"  सासूबाईन्चि  प्रतिक्रिया !! 

" आई, please मी समीरपासून काहीही लपवित नाही हे तुम्हाला माहित आहे न? मला माझ्या पद्धतीने त्याच्याशी बोलू द्या या विषयावर. तो नाही म्हणणार नाही आणि त्याने जर नाही म्हटलेच तर मी सोडून देईन. पण मला एक सांगा यात प्रिया - मनूचा काय दोष? मी त्यांच्याकरता आता यात लक्ष घालीन. माझ्यावर विश्वास ठेवा."  

 भाग 3

"आई,आई , प्रिया - मनुची मज्जा आहे सध्या !! "

"???"

"त्यांच्या आई - बाबांमध्ये मस्त COMPETITION सुरु आहे. शनिवारी त्यांचे बाबा त्यांना IMAX ला घेवून गेलेत, सिनेमा नी Video GAMES रविवारी आई G .V .K त दोन दोन दिवस मज्जा मज्जा !! "

प्रतीशच्या या बोलण्यावर हसावे कि रडावे तेच मला कळत नव्हते. आई वडिलांचं SO CALLED भांडण मुल खरोखरच N -JOY करत होती का ? त्यांचे या प्रकारात सारे फाजील लाड पुरविले जात होते हव तेव्हा हव ते मिळत होत. महिन्यातून कधीतरी एकदा कुरकुरे /चिप्स खाणारे प्रिया - मनु आता रोजच त्यावर ताव मारत होते !! त्यांची Health Conscious आईदेखील Office मधून येतांना Burger पिझ्झा आणत होती.

"हे काय सुरु आहे कुमार ?" संध्याकाळी जेव्हा कुमारचा फोन आला तेव्हा मी त्याच्यावर खेकसलेच.

" तुम्ही त्या दोन चिमुरड्यांना का वेठीस धरलेय ??" तुमच्या अशा वागण्यान तुम्हाला काय सिद्ध करायचंय ?

They are enjoying your break - up !!

"मला आता काहीही सांगू नकोस विशाखा !!  I am fed up of all these things !!

विश्वास उडालाय माझा या सर्वावरून !! सर्व माझ्या सहनशिलतेबाहेर गेलंय.

" कुमार "काय झालं ?" मी

"मला Notice पाठविलाय मायाने, ५०,००० रुपये महिना आणि २५,००० रुपये घरभाडे असे ७५,००० महिन्याला द्यायचेत तिला आणि पोटगी ६० लाख !! "

"नशीब १ करोड नाहि मागितले कारण तिला माहित आहे तू ते देवू शकतोस ' " मला एक पैसा पण नाहि द्यायचाय तिला !! माझ्याशी हि असली कोर्टाची भाषा ?? कोण असेल तिच्यामागे ??? Still I believe she is innocent !! या सर्वांमागे कुणा दुसऱ्याच डोकं काम करतंय !!"



"यामागे कुणाचंही डोकं वैगरे नाहीय कुमार !! मी रोज मायाच्या contact मध्ये आहे She is passing through psychological syndrome. यात माणूस कोर्टाची भाषा करत असतो नेहमीच !! याकरता ३ -४ कारण देता येतील - change in hormonal balance which always takes place at the age of 35 - 40 . Second Reason is sudden loss in weight due to over exercising which will lead to nervousness and Depression. या सर्व stages मधून जातांना तुम्हा दोघांमध्ये असलेली Communication Gap  आणि तीचा  एककल्ली स्वभाव त्यामुळे सतत टोचणार Neglection !!



ती नेहमीच तुमच्या आणि तुमच्या आईच्या गप्पा ऐकायची पण तिचा Ego तिला तुमच्यात येवून बसायला परावृत्त करायचा.  Don't worry सर्व व्यवस्थित होईल. "



कुमारच्या सततच्या फोन्स नि समीरच डोकं सटकल ," त्याला सांगून टाक विशाखा आता तिला psychiatric  कडे घेवून जावून २ -४ shocks दे म्हणून आणि स्वतःही १-२ Shocks लावून घे ! वर्षभर बायकोने हात नाहि लावू दिला तेव्हा याची बुद्धी काय शेण खायला गेली होती कि काय ? and tell him that you receive professional calls only between 12pm to 6pm  Don't disturb our private life " Through स्मिता, समीरचा निरोप कुमारपर्यंत पोहोचवला.



स्मितालाही एक ना अनेक भरपूर प्रश्न " विशाखा, तू मायाशी रोज बोलतेस असं कुमार म्हणत होता !! सांगितलं का काही तिने तुला त्या सरदारजीबद्दल ?? तू विचारलस त्याच्याबद्दल ??? ते पाच लाख ??? वैगरे वैगरे .........." " नाव घेवून नाहि  पण Direct विचारल होत तिला 'any crush ' म्हणून ?? तेव्हा तिने मला चांगलच उडवलं 'At this age?? Not finding interest in existing relationship why for one more ??' तसं नाहि काही दिसतंय, अग  तो  सरदारजी हर्बल प्रोडक्टचे काम करतो  आणि  तुला  माहित  आहे    हे  लोक  कसे  हात  धुवून  मागे  लागतात ??? एकाच दिवशी १० -१० वेळा SMS करतात 'जेवलीस का? काय जेवलीस ?' त्यात काही serious नाही पाच लाखांचं म्हणशील तर ते तिने तिच्या Salary Account मध्ये जमा केलेत Just as Security म्हणून तर तिच्यामागे Detective लावूनही कुमारला काहीही गवसलं नाहि "



" विशाखा, एक मोठी पूजा घालतोय आम्ही !! मनुची शांत करायला खास केरळहून गुरुजी येताहेत. मायाच डोकं फिरलंय उद्याच घर सोडीन म्हणतेय काहीही करून तिला पुढल्या गुरुवारपर्यंत थांबव. तिने पूजेला नाहि बसलं तरी चालेल पण तीच घरी असण महत्वाचं, दिवसभर ऑफिसला गेलं तरी चालेल पण रात्री घरी परतण आवश्यक माझ्या मुलाकरता !!" कुमारचा कळकळीचा फोन !!"



"Hmmmmmmm ...... तिला आज भेटतेय . Guarrenty नाहि देत पण मंगळवारी तिचा flat रिकामा करायचाय. "

"का ssss ???? " तो अवाक झाला.

"हो, आता मी जे सांगते ते लक्ष देवून ऐक. उद्या - परवा ती तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करेल तुझ्याकडून तू सकारात्मक रहा तुझ्या उत्तरांनी तिचे समाधान होणार नाहि शंभर टक्के !! तरीही ती म्हणेल ते ऐकून घे !! कुठलेही लेखी करार करू नकोस पण तोंडी आश्वासने दे !! She is going through Psychological Crisis.

तिचं नेलेल समान flat वरून माझ्या घरी आणतेय. हळू हळू ते तुम्हाला तुमच्याकडे दिसेल. त्याकडे दुर्लक्ष करा. धीर धरा सर्व व्यवस्थित होईल.



माझ्या आणि मायाच्या रोजच्या भेटी सुरूच होत्या. तिला व्यावहारिक धोके समजावून सांगायचा रोजचा प्रयत्न . लग्न झालेल्या बाईने एकट रहाण किती धोकादायक, आणि तेही मुलगी असताना , घरी नौकर, ड्रायव्हर, आजकाल तर Tution Teacher चाही भरवसा नाहि !! तुला नसेल रहायचं कुमारसोबत तर तू प्रियाच्या खोलीत रहा. पण तुझं त्या घरात रहाण जरुरीच आहे !! तू तुझा विचार करायला स्वतंत्र आहेस मी जबरदस्ती नाहि करणार पण भावनेच्या आहारी जावून चुकीचे निर्णय घेतलेस तर होणाऱ्या परिणामांना सिद्ध रहा. आणि तू वेगळी झालीस तर तुझा साथ देण मला कठीण जाईल. जसं तुझ्या सासूला तू प्रेमाशी केलेली मैत्री आवडायची नाहि तसंच उद्या माझ्या सासून म्हटलं तर मी त्यांना विरोध नाहि करू शकणार म्हणूनच माझी आणि प्रेमाची फक्त हाय - बाय चि मैत्री आहे हे तुला माहितीच आहे."



"पण विशाखा, तुला माहित आहे प्रेमाचं प्रकरण अगदी वेगळ आहे तिने घटस्फोट घेतल्यावर एका मैत्रिणीच्या नवऱ्याची रखेल राहाण पसंत केलं. " "कुठलीही प्रकरण वेगळी नसतात माया !! तुझे आई - वडीलही कुमारचीच तारीफ करतात आजही. वेगळी राहणारी Egoistic बाई !! हीच तुझी ओळख राहील. आता तुझा विचार तूच कर. जमल्यास एकदा कुमारशी समोरासमोर बसून बोलून बघ. तुझं मन दहा लोकांसमोर मोकळ करण्यापेक्षा त्याच्यासमोर मोकळ कर. तो तुला नाहि म्हणणार नाहि." "तो घाबरट आहे विशाखा, बदनामीला भितोय " " मग तेच सही माया, घे त्याच्या घाबरण्याचा फायदा !!आणि बोलून टाक जे तुझ्या मनात आहे ते. उगीच भाड्याच्या घरात रहाण्यापेक्षा स्वत:च्याच घरात रहा paying Guest सारखी पैसे घेवून !! म्हणजे तुला प्रिया - मानुकडेही लक्ष देता येईल."



" मी विचार करून सांगते", माया. "आज बुधवार शुक्रवारी लंच सोबत घेवू. तोपर्यंत विचार करून ठेव. मंगळवारी ३० तारीख आहे  महिनाही संपतोय.flat च भाडं बंद कर. तू रहात नाहीस तिथे. फुकट कशाला पैसा वाया घालवते ?? शिफ्ट करू सर्व सामान मंगळवारी !!" मी  माझ्या आणि मायाच्या मैत्रीत आत बाहेर असं काहीही नसल्याने आमच tunning छान. पण आज तीच मैत्री मी पणाला लावल्याने स्वारी थोडी हादरल्यासारखी दिसली. दोन दिवस मी मात्र तिला फोनही केला नाहि. एकदम शुक्रवारी SMS केला १२ वाजता ," आपण भेटतोय मालगुडीत जेवायला एक वाजता " मी पोहोचली तेव्हा माया वाटच बघत होती. "काय ठरवलं आहेस?" मी "मी बोलले कुमारशी, तो होच म्हणणार होता. " माया "मग मंगळवारी सामान शिफ्ट करू .

"किती समान आहे ??' मी

"दोन ऑटोत मावेल" माया

"ठीक आहे माझ्या कारमधून करू शिफ्ट !!" मी

"पण घरी कसं नेवू ? घरच्यांना काहीच माहित नाहि. मी थोडं थोडं सामान हलवलय." माया

"काही हरकत नाहि. माझ्या घरी ठेवू. सासूबाई ९ -९:३० ला झोपतात आणि समीर ११ ला येतो त्यावेळेत मी करीन manage ! डीक्कीतील सामान डीक्कीतच राहू देवू."

 सर्व ठरविल्याप्रमाणे झालं. मंगळवारी आम्ही मायाच्या Flat वर गेलो. तिचा तो flat पाहून मी तर flatच झाली. 2BHK with terrace Garden च्या प्रशस्त जागेत हि बाई एकटी राहणार होती !! म्हणून हिला ७५,००० रुपये महिना हवा होता.

तिचं सर्व सामान गोळा केलं आणि माझ्या कारमध्ये भरलं.

मायाच्या वेगळ होण्याला वेगळ वळण देवून !!   

आज वर्ष झालं या गोष्टीला !! नवरा बायको एकत्र मुलांच्या स्नेह्सम्मेलानाला जातात, मुलांना घेऊन picnics , सिनेमे, अगदी विदेशी दौरा देखील असतो वर्षातून एकदा..... पण दोघांच्याही बेडरूम्स वेगळ्या !!

नक्की कुठून सुरु झाली असेल हि घुसमट ??? सतत दुसऱ्यांसाठी असणाऱ्या त्याग भावनेतून असेल का याची व्यूत्पत्ती ?? मी किती चांगली सून, बायको, आई, गृहिणी.... या विळख्यात अडकलेली असतांना अचानक स्वत्वाची भावना जागृत होवून त्यातून निर्माण झालेली हि अवस्था..... आणि मग या घुसमटीने जीव गुदमरत असतांना मोकळा श्वास घेण्यासाठी साठी जेव्हा "मी" म्हणून एक स्त्री बाहेर पडण्याचा प्रयत्न करते तेव्हा समाज, मैत्रिणी, नातेवाईक इतकेच नव्हे तर आपली आई सुद्धा आपल्याला समजून घेत नाही या अपार दु:खाचे पाठीवर ओझे घेवून आपण वावरतो..... खरच काय आवश्यकता असते असले बुरखे पांघरण्याची.... कौटुंबिक जबाबदारी हि काही नोकरी नसते.... राजीनामा दिला आणि सुटलो.. एका चक्रव्युहात अडकल्यासारखे आपण त्यात बांधले जातो अनेकानेक नात्यांनी..... जबाबदाऱ्यानी... आणि अचानक मधेच खडबडून जागे होतो... नको वाटत...हे सर्व.... सगळ्याच गोष्टी लादलेल्या ...जरी याची सुरवात आपणच आनंदाने केली असली तरी....


No comments:

Post a Comment