विशाखासमीर मशानकर

विशाखासमीर मशानकर
"विश्वत" माझे पहिले पुस्तक

मैत्रीचे नाते जपून बघू

My Daddy Fool Fool Fool
My Daddy Fool Fool Fool

"फादर्स डे" च्या दिवशी अचानक वर्गातून आलेल्या या आवाजाने मी अवाक् झाले. नविन शाळा नविन विद्यार्थी यामुळे  बरेच प्रश्नार्थक चिन्ह होते. त्या मुलाला मी जवळ बोलाविले तर त्याच्यासोबत त्याचे ५-६ मित्र पण आलेत. सहज हसून मी त्याला विचारल, " का रे राजा का अस बोलतोस ??" त्याच्या आधी त्याचे मित्रच ओरडलेत "अनुरागच्या च्या आई वडिलांचा डिवोर्स झालाय म्हणून हा नेहमीच अस बोलतो."     
मी त्या सर्व मुलांना जागेवर बसायला सांगितलं आणि अनुरागला थांबवून घेतलं. त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.माझ बोलण झाल्यावर लगेच त्याच उत्तर, "तुम्ही माझ्या आईला बघितलत ? किती छान आहे न ती ?? दिसायला आणि स्वभावाने पण.......मग इतक्या छान बाईला जो माणूस टाकून देतो तो फूलच कि नाही ???"
तेव्हढ्यात माझा पिरेड संपला. नंतरचा पिरेड ऑफ असल्याने मी टीचर्स रुममध्ये येवून बसले. पण मनान मी त्या अनुराग जवळच होते. केव्हढा आक्रोश त्याच्या मनात वडिलांबद्दल !!! आई वडिलांच्या चुकांचे लहान मुलांवर कळत न कळत असे परिणाम दिसू लागतात. त्यातल्या त्यात १० -१२ वर्षाच्या मुलाचं वय फार नाजूक असत. आपण त्याला बऱ्याच वेळा "प्रोब्लेम एज" असही म्हणतो. साधारणत: ८-१०  वर्षापर्यंत मुल आपण जे सांगू तसे वागत असतात. त्यांच्या जीवनाची चावी आपल्या हातात असते. आपल्या डोळ्यांनी ते सार विश्व बघत असतात. मुल १० वर्षांचं झाल कि सभोवतालच जग अनुभवायला शिकत. आणि मग त्याला घरून शाळेतून तसेच शेजाऱ्या - पाजाऱ्याकडून जे डोज मिळतात त्यावर त्यांच्या आयुष्याची इमारत उभी रहाते.
याच काळात घरातील घडामोडींना वेग आलेला असतो. सिनिरीटी वाढल्यामुळे आई वडिलांची पदोन्नती ..... पर्यायी त्यांना सतत भासणारी वेळेची कमतरता.......मुलांकडून भरमसाठ अपेक्षा....... यात मुला बालपण कुठेतरी हरवून जात. आणि मग त्या बालमनात धुमसत राहते एक शांत आग ........... या आगीला थोडी जरी हवा मिळाली कि मग तिचा स्फोट होतो. न कळत मग आपल्या तोंडून प्रश्न निघतो, इतक्या लहान वयात याला हे कळल कस ????
मायेचा स्पर्श, प्रेमाचा ओलावा, थोडा वेळ, मैत्रीपूर्ण संबंध.........हेच  आपल्या अणि आपल्या मुलाच्या रेशमी बंधनाचे अलंकार !!
                                                                                        - विशाखा मशानकर,  हैदराबाद

3 comments: