विशाखासमीर मशानकर

विशाखासमीर मशानकर
"विश्वत" माझे पहिले पुस्तक

लेख - सकारत्मक दृष्टीकोन

सकारत्मक दृष्टीकोन……
लालयेत पंच वर्षाणि दश वर्षाणि ताडयेत
प्राप्तेषु षोडशे वर्षे पुत्रे मित्र वदाचरेत !!
सृष्टीचा किती सुंदर नियम या सुभाषितात सांगितलाय !! आपल्या मुलाच्या पायात जेव्हा आपली चप्पल यायला लागते तेव्हा मुलगा आपली जबाबदारी वाटायला सक्षम होत असतो ....पण आपल्यापैकी किती जण हा नियम अहं पणा सोडून खिलाडू वृत्तीने स्वीकारतात ?? बहूतेक पालक वर्ग मुलांची क्षमता त्यांनी मिळविलेल्या गुणांवर ठर

वतात..... त्यांच्या अंगभूत गुणांवर नाहि !! मग 'तुला काय अक्कल???' या तोमण्याखाली त्याच्या भवितव्याचा विचार केला जातो...... त्याचा विचार न घेता त्याची आयुष्याची पायवाट आपणच तयार करून देतो.... अशा वेळेस संभ्रमित झालेला आपला मुलगा वेळोवेळी अपयश आणि अपमान यांचा सामना करत भरडला जातो.
भरकटलेले आयुष्य आणि भरडलेला भूतकाळ घेऊन हि युवा पिढी खरच आपले भविष्य घडवू शकेल ??? आज आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला कणखर आणि खंबीर युवकांची आवश्यकता आहे !! मग असे युवक कसे तयार होणार??? पुस्तकी ज्ञानातून ??? कि जीवन जगण्याच्या कलेतून ??? आज आपल्या देशातील जास्तीत जास्त लोकसंखेचा वाटा युवकांचा आहे. हि युवा पिढी सतत आभासी जगतात वावरतांना दिसते !! का ???? कदाचित खऱ्या जगात रमण्यापेक्षा
आभासी जगात रमणे सोपे वाटत असेल !! सततच्या ताण तणावाच्या आयुष्यात आभासी जग त्यांना शांत जगण्याची हमी देत असेल. आणि मग आत्मकेंद्रित झालेला हा युवा वर्ग आपल्या गुणांपेक्षा आपल्या ब्रँडिंगला जास्त महत्व देतोय. आय पॅड, आय पॉड, लॅपटॉप, यांच्या अधीन झालेल्या या युवा वर्गाची उर्जा जर सकारात्मक दिशेने पद्क्रमण करत राहिली तर नक्कीच त्यातून अनेक चांगले कार्यक्रम घडू लागतील.... नव्हे घडताहेत.
जगावेगळ काही करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि त्याला जर पालकांची साथ मिळाली तर व्यवहारात कितीही अडचणी आल्यात तरी धैर्याने त्याला समोर जाण्याची हिम्मत हीच शिदोरी आपल्याला बांधून द्यायची असते आपल्या लाडल्यांना !! एक सकारत्मक दृष्टीकोन आणि त्यांचे मनोधैर्य वाढविणारे प्रेमाचे चार शब्द !!
- विशाखासमीर (दिवाळी अंकात पूर्व प्रकाशित)

No comments:

Post a Comment