विशाखासमीर मशानकर

विशाखासमीर मशानकर
"विश्वत" माझे पहिले पुस्तक

स्त्री मुक्ती म्हणजे नेमके काय ??

स्त्री मुक्ती म्हणजे काय ???
खूप दिवसांपासून मला एक प्रश्न पडतो..... या काही बायका "स्त्री मुक्ती.. स्त्री मुक्ती" म्हणून ओरडत असतात सारख्या... यांना नेमके काय हवे असते ??? म्हणजे पुरुषांना शिव्या देणे... कि त्यांची बरोबरी करणे ?? अरे ज्या निर्मात्यानेच पुरुष व बाईला वेगवेगळे निर्मिले आहे ते बरोबर कसे ?? वंशवृद्धी प्रत्येकाला हवीच असते मग ती बाई असो कि पुरुष.... आता मी असे म्हटले कि या खवळून उठणार .... कारण केजी तील मुलांसारखीच यांची अक्कल.... पण माझ्या दृष्टीकोनातून वंशवृद्धी म्हणजे कोणीही .... प्रत्येकाला एक अपत्य असणे मग ते मुलगा किंवा मुलगी कोणीही ... तर या अपत्य होण्याची एक प्रोसेस ... यात मग या मुक्तीवल्या स्त्रीयांना माझा एक प्रश्न... इथे दाखवा ना... समानता.... कशाला पुरुष हवाय वर चढ ??? समांतर होवून जावू द्या .....
माझ्या दृष्टीने बुरख्यातली ती बाईपण मुक्त आहे जी व्यसनी नवऱ्याला सोडून एखाद्या Beauty Parlour मध्ये १० हजाराची नौकरी करतेय आणि आपल्या दोन मुलांना वाढवतेय. माझ्यामते ती कामवाली बाई देखील मुक्त आहे जी नवऱ्याच्या मुस्कटात मारून चार घरची धुनी भांडी करतेय आणि आपले कुटुंब पोसतेय. माझ्या मते त्या डोक्यावर पदर घेणाऱ्या माझ्या मैत्रिणीही मुक्त आहेत ज्या ३ महिन्यातून एकदा पहाटे भाजी बाजारात जमतात.... तेथील नेत्यांशी, गुंडांशी भांडून बाल मजुरांना मुक्त करून आश्रमात पोचवतात... एक एक करून महिन्यातून एकदा त्यांच्या खाण्यापिण्याची जबाबदारी उचलतात. माझ्या मते तरी या सर्व गृहिणी मुक्त आहेत ज्या आपल्या मुलांना त्यांच्या पॉकेट मनीतील काही भाग विधवा पेन्शनला द्या असे संस्कार त्यांच्यावर करतात. नुसते मॉड कपडे घालून समुद्राच्या काठावर बसून स्त्रीमुक्तीच्या कविता वाचणाऱ्या थोतांड गप्पा मारणाऱ्या काय मुक्ती घडवून आणणार ??? या पोस्ट वर जशा जशा Comments येतील तशी चर्चा आणि मुद्दे वाढतीलच. तूर्तास इतकेच.....
स्त्री मुक्ती .. या प्रश्नाचे उत्तर अजून जसे मला सापडले नाही तसाच अजून एक प्रश्न माझ्या मनात नेहमी घिरट्या घालतो आणि तो म्हणजे धर्म निरपेक्षता !! आता हि धर्म निरपेक्षता म्हणजे काय... अगदी अर्थाअर्थी अर्थ घेतला तर धर्म निरपेक्ष म्हणजे पक्षपात रहित !! मग सर्व जातींचे, धर्माचे पारडे समान....हो ना ??? पण चुकीचा अर्थ आहे हा.... निव्वळ आपली पोळी शेकून घेण्यासाठी नव्हे तर आपली पोळी करपू नये म्हणून लावलेल्या वेगवेगळ्या चुलींवर या शब्दाचा अर्थ बदलतोय ...... आजच नव्हे तर वर्षानुवर्षांपासून... एक विशिष्ट धर्म - जात म्हणून विशेष सवलती.... नाही नाही.... बहुसंख्य मतदार ज्या धर्माकेडे किंवा जातीकडे आहेत त्यांना विशेष सवलती. आणि अल्पसंख्य मतदार असणाऱ्या जाती व धर्म दुर्लक्षित. एखाद्या विशिष्ट जातीची वा धर्माची लोकसंख्या जास्त असण्याचा इथे काहीही संबंध नाही.... कितनी पेटीया ?? अर्थात मतांची ... असे विचारले गेले कि झाले. खरच हि असली सिस्टीम आपल्या देशात असतांना धर्म निरपेक्षतेचा ढोल वाजवत आपण फिरतोय.... मग आपल्यावर आपण हसावं कि आपणच आपली कीव करावी ???
 

No comments:

Post a Comment