विशाखासमीर मशानकर

विशाखासमीर मशानकर
"विश्वत" माझे पहिले पुस्तक

माझ्या नावाची ऐसी कि तैसी

माझ्या नावाची ऐसी कि तैसी......
"विशाखा रामचंद्र देशपांडे" असे सोप्पे नाव घेवून 20 वर्षे वावरल्यावर आता दुसरे नाव लागणार. ... आम मुलींप्रमाणे....
आमच्या ग्रुपमध्ये लग्न जमण्यात पहिला नंबर माझा असल्याने पहिले तर कोणालाच सुचेना काय बोलावे ते !! मलाहि का कोण जाणे उगीचच कंपूतून बाहेर काढल्याचा भास झाला. .. तेवढ्यात एकाने शांतता मोडली आणि पहिलाच प्रश्न "ए, तुझे आडनाव नेमके काय?? म्हशाणकर, मशालकर, स्मशानकर..... आणि मग प्रत्येक जण हवा तसा उच्चार करू लागले. मलाही काहीच समजेना काय उत्तर द्यावे ते !! कारण इतक्या लवकर लग्न करायचे नाही या रेट्यात नेमके आडनाव विचारायचे राहूनच गेले होते.... आता तर या टग्यांना कोलीतच हाती लागंल. तेवढ्यात आठवलं माझा होणारा नवरा संगीताचा चुलत मामेभाऊ... "ए बाई सांगून टाक ना नेमके काय आडनाव आहे ते !!" आणि मग सर्वांनी मिळून माझे पाठांतर घेतले.
"विशाखा समीर मशानकर" ... या नावाने मिरवणे सुरू झाले.
नावाची खरी खिरापत हैदराबादला झाली आणि अजूनही होतेय. सर्वात मोठी मजा म्हणजे "विशाखा"चा एकच अर्थ "विशाखापट्टन" म्हणजे Pure Telugu त्यात हे आडनाव. .. कोणी बरोबर वाचतच नाही मग मशानकर चे महाशंकर अगदीच अलगद होते. समोरची व्यक्ती गृहित धरून सरळ सुरू होते "बाऊन्नारा Madom??"
कितीतरी वेळा सांगितलं. . Visaka, Vishaka, Visakha असे काहीही नूसन Vishakha Mashankar आहे. मग हिंदी पेपर मधे नाव येतं विशाखा माशंकर...
तेलुगु लोकांचे ठीक आहे हो.. पण आत्ताच आंध्र प्रदेश मराठी साहित्य संमेलनाच्या पत्रिकेत माझे नाव "विशाखा महाकाळकर" तरी मराठीत नाव लिहून दिले होते त्यांना.... पण काय करणार ???? नावात काय आहे ???
एखाद्या कार्यक्रमात गेलं कि कोणीतरी परिचय वाचतं आणि तावातावात "Let me present before you... today's Guest.. Visaka Maha sankar..." हसावं कि रडावं ...

No comments:

Post a Comment