विशाखासमीर मशानकर

विशाखासमीर मशानकर
"विश्वत" माझे पहिले पुस्तक

भटकंती - किसरगुट्टा


कीसरगुट्टा ... हैद्राबादहून जवळपास ३० किलोमीटरवर हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत वसलेलं महादेवाचं जागृत देवस्थान. कुठल्याही मौसमात जा ... प्रसन्नच वाटत. भोवताल पसरलेला निसर्ग आणि देवाचं वास्तव्य असल्याची जाणीव करून देणाऱ्या अनेक गोष्टी. मग अगदी प्रत्येक दगडातही आपण देव पाहू लागतो.
कथा  : रावणाचा वध करून येत असता प्रभू श्रीरामांना याच डोंगरांच्या सानिध्यात महादेवाला एक अभिषेक करायचा होता. त्यांनी हनुमानाला वाराणशीहून शिवलिंग आणावयास सांगितले. नेहमीप्रमाणे "हे घेवू का ते" या संभ्रमी वृत्तीने हनुमानजींनी १०१ लिंगे आणलीत. परंतु असे करीत असतांना इकडे अभिषेकचा मुहूर्त टळून जात होता. म्हणून स्वत: श्री महादेव प्रकट झालेत आणि त्यांनीच प्रभू श्रीरामाला एक भले मोठे लिंग देवून त्याची पूजा करावयास सांगितली.
अभिषेक झाल्यावर हनुमानजी १०१ शिवलिंग घेवून प्रकटलेत ... त्यांना भयंकर राग आला...... आणि मग रागाच्या भरात त्यांनी सर्व लिंग त्या पहाडावर भिरकावून दिलीत..... आजही त्या ठिकाणी इतस्तत: पसरलेली शिवलिंग दिसतात... एका भल्या मोठ्या बजरंगबलीच्या मूर्तीसोबत !!
  आम्हा पूर्ण कुटुंबियांच आवडतं तीर्थक्षेत्र. मग मनात आलं तेव्हा गाडी काढायची आणि मनमुराद त्या निसर्गाच्या साम्राज्यात वसलेल्या असंख्य शिवलिंगां शी हितगुज करायचं !!

Keesaragutta Temple is a temple dedicated to Lord Siva and his consorts Bhavani and Sivadurga at Keesaragutta in Rangareddy district. It is about 40 km from Hyderabad and 10 Km from ECIL. It is located on a small hillock. The temple draws thousands of devotees on Shivaratri.
Legend has it that Sri Rama installed the Siva lingam here to atone for the sin of killing Ravana, a Brahman. He selected this beautiful valley surrounded by hills and verdant greenery for the purpose and ordered Hanuman to bring a Sivlingam from Varanasi. Hanuman was late in arriving with the Siva lingam and as the auspicious hour was nearing, Lord Siva himself appeared before Sri Rama and presented a Sivilingam for installation. Hence the lingam in the temple is called Swayambhu Linga. It is also called Ramalingeswara as lord Sri Rama had installed the lingam.
Hanuman returned with 101 lingams for selection from Varanasi and felt aggrieved at not having his lingam installed. Hence he threw them all over the area. Even to this day several lingams are found scattered all over the place outside the temple.
To mollify Hanuman, Sri Rama ordained that precedence would be given to him for worship at the temple. He also said that the hillock where the lingam was installed would bear his name kesarigiri i.e., Hanuman, the son of Kesari. Over a period of time, it has become corrupted and is now known as Keesara and the hill as Keesaragutta. Ever since, the rituals follow the command of Sri Rama.

No comments:

Post a Comment