विशाखासमीर मशानकर

विशाखासमीर मशानकर
"विश्वत" माझे पहिले पुस्तक

माझ्या चारोळ्या - प्रभातीच्या


माझ्या चारोळ्या  - प्रभातीच्या 


आज लोपली तिमिरात
क्रांती ती उजळू दे
भेदण्या भेद भास्करा
तेज तुझे आम्हास दे !!
******************
चैतन्याची रास घेवूनि
सूर्य किरणे आली दारी,
द्वेश भावना सार्या पेटवूनि
चला करु होळी साजरी !!
************************
प्रभातकाली हळूच कानी
निशा विश्वास देवूनी गेली
सिद्ध करण्या स्वप्ने कालची
प्राचीही कुमकुम घेवून आली !
*******************
प्रभातकाली कनवाळू सिद्ध
द्यावया आशीर्वच भूवनी
चैतन्ये सजली लेकुरे
गळा ध्यानमाला लेवुनी !!
*******************************
पद्म्योगी पद्म्नंदिनी - पद्मनाभ
करिती पदन्यास
पुण्यवेळी चौफेर उधळली
चैतन्याची रास !!

**********************

नाजूक नाजूक साज साजिरी
सोने लेवुनी प्रभात आली
निर्मळ निर्मळ दवबिंदू परिधान
कोवळी कोवळी पाकळी ल्याली !!

************************************

प्रभात समयी कवाडे
मनाची मी उघडली
आत्माविष्कार जाहले
आज आश्वस्त नयनी !!

*************************

पुण्यवेळी पुण्यशीलही
पुण्यक्षेत्र उजळली
 यथार्थविषयी यथार्थबुद्धी
प्रात:काली प्रकटली !!

************************
सोनियाचे क्षण घेऊन
आज सकाळ अवतरली
statue
दिलेल्या कामांना
हलकेच Go म्हणाली !!

****************************

गंधात बघ आज तुझ्या
सोनेरी पहाट न्हाली
रवि किरणावर तेज चढले
 
उजळली काया ऐसी !!

*********************************

आज  सूर्याकडे बघितलं
त्याच्यासारखं जगावं का  ??
विचारांनी मनाला ग्रासलं
तोही  हसून  म्हणाला
तुला का प्रश्न पडावा  ??
नाहि का लागत ग्रहण मला ??

***********************************

सूर्याची तेजस्विता
आज मला खुणावतेय
परीघ सोडून बाहेर ये
सुप्रभात म्हणतेय !!

********************************

सोनेरी पावलांनी 
भोर आज प्रकटली
नभरांगणीची आव्हाने 
पेलण्या सिद्ध झाली !!

******************************
लक्ष लक्ष किरणांनी
क्षितिजे न्हाली
स्वप्नांच्या साक्षीने
मुखकमले उजळली !!