विशाखासमीर मशानकर

विशाखासमीर मशानकर
"विश्वत" माझे पहिले पुस्तक

Discrimination Of Boys


रोज रोज आदळणाऱ्या बातम्या !! काळीज चिरणारे फोटोज, अगदी डोळ्यातून आग आणि पाणी एकाच वेळी काढणाऱ्या विश्लेषणात्मक बातम्या !! जागोजागी चालणारे वाद - विवाद....... आणि बरेच काही ...... हे सर्व अनुभवल्यावर एकच विचार डोक्यात येतो..... हे असे का ??? याला जबाबदार कोण ?? वासनेने भुकेला माणूस कि त्यांना प्रवृत्त करणाऱ्या भडक व्यक्तिमत्वातील मुली/स्त्रिया ??? उत्तर "नाही" !! याला जबाबदार पुरुषप्रधान संस्कृतीही नाही किंवा त्यांच्या बरोबरीने वागणाऱ्या मुलीही नाहीत.
इथे मी माझे मत मांडतेय. जर कुणाला आपले मत मांडायचे असेल तर स्वागत !!
नुकतीच मुलाच्या पालक सभेत शाळेत एक चर्चा झाली. एक पालक जीव तोडून शिक्षकांना सांगण्याचा प्रयत्न करत होती, " आम्ही आमच्या मुलांना Co Education च्या Corporate  शाळेत का टाकलं ?? कारण आम्हाला वाटल कि इथे मुलांना सर्वांगीण विकासाचे पूरक वातावरण मिळेल. पण इथे वेगळाच अनुभव  येतोय. माझा मुलगा ५ वीत आहे. आणि तो मुलींचा भयंकर राग करतो ........ का ??? कारण एकंच.... Discrimination !! प्रत्येक वेळेस मुलींना हवी ती मुभा देण, मुलांनी तीच चूक केली तर त्यांना शिक्षा, भर वर्गात अपमानास्पद वागणूक !!"
आपण घराघरातही बऱ्याच वेळा हेच वातावरण अनुभवतो आणि न कळत आपल्या मुलांमध्ये मुलींबद्दलचा द्वेष वाढत जातो !! कधीतरी त्याचा स्फोट होतो आणि आपण सिस्टीमला दोष देतो !! यात चुकी कुणाची ???? 

No comments:

Post a Comment